घरCORONA UPDATEMumbai Corona Update: गेल्या २४ तासात ३४६ नवे रुग्ण, मृत्यूसंख्येत वाढ

Mumbai Corona Update: गेल्या २४ तासात ३४६ नवे रुग्ण, मृत्यूसंख्येत वाढ

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासात  ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत काल ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आज मृत्यूच्या संख्येत २ने वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारा चढउतार अद्याप सुरुच आहे. गेल्या २४ तासात मुंबईतील नव्या बाधितांची संख्या वाढली आहे. आज शनिवारी मुंबईत ३४६ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. शुक्रवारच्या तुलनेत मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ ने वाढली आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ७ लाख ३४ हजार ७८१ इतकी आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात  ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत काल ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आज मृत्यूच्या संख्येत २ने वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांचा विचार केला असता ही संख्या आता १५ हजार ८८९ इतकी झाली आहे. (Mumbai Corona Update: 346 new covid19 patients, death toll rises in last 24 hours)

- Advertisement -

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९७ टक्क्यांवर आला असून मुंबईत २४ जुलै ते ३० जुलैचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.५ टक्के इतका झाला आहे. रुग्णवाढीची संख्या कमी होत असतानाच रिकव्हर होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढले आहे. मुंबईत आज बाधितांपेक्षा रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून मुंबईत आज शनिवारी ४४४ कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

- Advertisement -

मुंबईत शनिवारी ३४ हजार २०२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील ३४६ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत सध्या ४ हजार ९७२ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोनाविषयी अधिक सावधनता बाळगळे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – India Corona Update: गेल्या २४ तासांत बाधितांमध्ये घट तर मृतांमध्ये वाढ; ४१,६४९ नवे रूग्ण, ५९३ मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -