Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा ! शनिवारी ३४७ कोरोना रुग्णांची नोंद, ६३५ कोरोनामुक्त

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी ४३ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहे तर ११ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. इतर रुग्ण घरीच क्वारंटाइन होऊन उपचार घेत आहेत.

Mumbai Corona Update 347 new corona patients and 3 death in mumbai last 24 hours
Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा ! शनिवारी ३४७ कोरोना रुग्णांची नोंद, ६३५ कोरोनामुक्त

Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून मुंबई कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबईत शनिवारी ३४७ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ही १ लाख ५३ हजार ७६२ इतकी आहे. तर मुंबईत आज शनिवारी ६३५ रग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोना आतापर्यंत एकूण १ लाख ३१ हजार ३०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत एकूण ३९ हजार ५९२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील केवळ ३४९चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी ४३ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहे तर ११ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. इतर रुग्ण घरीच क्वारंटाइन होऊन उपचार घेत आहेत.

मागच्या २४ तासात मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसंख्या पाहता आज मुंबईत ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हिच संख्या १ इतकी होती. मुंबईतील डेथ रेट हा शून्यावर येण्याच्या वाटेवर आहे. मुंबईचा सध्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.०६ टक्के आहे तर पॉझिटिव्ही रेट हा ९८ टक्के आहे. मुंबईकरांना दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत सध्या एकही कटेंनमेंट आणि सक्रिय सीलबंद इमारत नाही. त्याचप्रमाणे मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली असून मुंबईत सध्या २ हजार ९२५ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


हेही वाचा – India Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ५०,४०७ नव्या रुग्णांची वाढ, तर…