घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ! ४ हजारांहून अधिक रुग्णांची...

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ! ४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पण आज कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ४ हजार १४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८ हजार २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ३५ हजार ५४१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ९१२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ लाख ५५ हजार १०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

मुंबईत सध्या ६६ हजार ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात मुंबईत ३० हजार ४२८ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५३ लाख २ हजार ४९० जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ३५ रुग्ण पुरुष आणि २४ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. ३२ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित २४ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर आता ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर १.०१ टक्के असून मुंबईतील दुप्पटीचा दर ६८ दिवस झाला आहे. सध्या मुंबईत सक्रिय कंटेनमेंट झोन १११ असून १ हजार १३१ सक्रिय सीलबंदी इमारती आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ICU बेड मिळवण्यासाठी थेट HC मुख्य न्यायाधीशांनीच केला BMC Covid-19 हेल्पलाईनवर फोन


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -