घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ, ६ जणांच्या...

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ, ६ जणांच्या मृत्यूची नोंद

Subscribe

मुंबईत नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून चढउतार होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ४०४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३८२ जण दिवसभरात बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३५ हजार १६५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ७९५ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ११ हजार ६९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ५ हजार २८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासांत ३२ हजार ३८२ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ८० लाख ५० हजार ७५९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान आज मृत्यू झालेल्या ६ रुग्णांपैकी ५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यातील ३ रुग्ण पुरुष आणि ३ रुग्ण महिल्या होत्या. या सर्व ६ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. आता मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. तर २१ जुलै ते २७ जुलै पर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के आहे.

सध्या मुंबईतील दुप्पटीचा दर १ हजार ३८३ दिवस झाला आहे. मुंबईतील सक्रिय कंटेनमेंट झोन ६ असून सक्रिय सीलबंद इमारती ५९ आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लहान मुलांच्या लसीकरणाबाबत खुशखबर! SIIच्या Covovax लसीच्या ट्रायलला मान्यता?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -