Sunday, May 2, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत ५,६५० रुग्णांची कोरोनावर मात, तर २४ तासात...

Mumbai Corona Update: मुंबईत ५,६५० रुग्णांची कोरोनावर मात, तर २४ तासात ४ हजार १९२ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत मागील २४ तासात एकूण ८२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाबाधितांच्या नव्या नोंदणीचा वेग मंदावला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाला मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी करायला यश आले आहे. गेल्या काहीदिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ४ हजार १९२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसाला ८ ते ११ हजार रुग्णांची सतत नोंद होत होती मात्र आता ती चार हजारांच्या घरात आली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना वाढीचा वेग मंदावताना दिसत आहे. तसेच एकूण ५ हजार ६५० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईत मागील २४ तासात एकूण ८२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १३ हजार ७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत एकूण ६४ हजार १८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत एकूण ४,१९२ कोरोनाबाधितांची गेल्या २४ तासात नोंद झाली असून आतापर्यंत ६ लाख ४४ हजार ६९९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ३८ हजार ८४८ कोरोना चाचण्या करणयात आल्या आहेत. तसेच एकूण ५३ लाख ८० हजार ४७३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ८८ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत कोरोना बाधितांची नोंदणी कमी होत असल्याने रुग्ण दर वाढीचा दर वाढताना दिसत आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर ४३ रुग्ण पुरुष व ३९ रुग्ण महिला होते. ३ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते. ५१ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित २८ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

- Advertisement -