घरCORONA UPDATEMumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ९५१ दिवसांवर, गेल्या...

Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ९५१ दिवसांवर, गेल्या २४ तासात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

मुंबईतील सध्या ६ हजार ९७३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असून आतापर्यंत एकूण ७ लाख ३० हजार २४१ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई पालिका क्षेत्रात शुक्रवारी मागील २४ तासात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४७० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली असून सध्या ६ हजार ९७३ कोरोनाबाधितांवर मुंबई पालिका क्षेत्रात उपचार सुरु आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु राज्यातील ८ ते ९ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता देता येणार नसल्याचे राज्य सरकारने म्हटलं आहे. यामुळे मुंबईकरांना शिथिलतेसाठी अजून काही काळ प्रतिक्षा करावीच लागणार आहे.

मुंबईतील सध्या ६ हजार ९७३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असून आतापर्यंत एकूण ७ लाख ३० हजार २४१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७ लाख ५ हजार २३४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १५ हजार ६७८ कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत मागील २४ तासात ४७० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून ३५ हजार ३६२ कोरोना चाचण्या गेल्या २४ तासात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ७७ लाख ३९९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ८ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष व ४ रुग्ण महिला होते. ८ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित ३ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर ९ जुलै ते १५ जुलै या एक आठवड्याच्या कालावधीत कोविड वाढीचा दर ०.०७ टक्क्यांवर आला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ९५१ दिवसांवर गेला आहे.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -