घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत ४५३ नव्या रुग्णांची वाढ, १० जणांच्या...

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत ४५३ नव्या रुग्णांची वाढ, १० जणांच्या मृत्यूची नोंद

Subscribe

मुंबईतील आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. पण कोरोना बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. काल, सोमवारी मुंबईत ४८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून १० जणांचा मृत्यूची नोंद झाली होती. तर ६४५ जण कोरोना रुग्ण बरे झाले होते. आज मुंबईत २४ तासांत ४५३ नवे कोरोनाबाधित आढळले असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २५ हजार ६२०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ५६४ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ९९ हजार ८२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ७ हजार ९०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आज दिवसभरात मुंबईत ३० हजार ५५४ कोरोनाच्या चाचण्या झाल्या होत्या. आतापर्यंत ७३ लाख ५३ हजार ७३७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ६ रुग्ण पुरुष आणि ४ रुग्ण महिला होत्या. ४ रुग्णांचे वय ४० वर्षाखाली होते. ६ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते.

- Advertisement -

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९६ टक्के झाले असून १९ जून ते ५ जुलै २०२१ पर्यंत एकूण कोरोना वाढीचा दर ०.०८ टक्के इतका झाला आहे. मुंबईतील दुप्पटीचा दर आता ८२२ दिवसावर पोहोचला आहे. सध्या मुंबईत १३ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर सक्रिय सीलबंदी इमारती ७४ आहेत.


हेही वाचा – मुंबई अग्निशमन दलात स्वच्छतेसाठी खासगी यंत्रणा; ९३ लाखांचा खर्च


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -