घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ, आजही...

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ, आजही १२ जणांच्या मृत्यूची नोंद!

Subscribe

मुंबईत आज, रविवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. तर मृत्यूची संख्या स्थिर आहे. तसेच आज कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ४५४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३१ हजार १६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ७०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईत आज ५१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७ लाख ६ हजार ५५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ६ हजार ६१८ जणांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात मुंबईत ३२ हजार ३७३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ७७ लाख ६६ हजार २५२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ८ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ८ पुरुष व ४ रुग्ण महिल्या होत्या. ६ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ६ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

सध्या मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के इतके आहे. ११ जुलै ते १७ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०७ टक्के असून दुप्पटीचा दर १००१ दिवस आहे. मुंबईत सध्या सक्रिय कंटेनमेंट जोन ६ असून सक्रिय सीलबंद इमारती ६३ आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत वाढ!


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -