घरमुंबईMumbai Corona Update : गेल्या २४ तासात ४६६ नवे रूग्ण तर ८०६...

Mumbai Corona Update : गेल्या २४ तासात ४६६ नवे रूग्ण तर ८०६ जणांनी केली कोरोनावर मात

Subscribe

मुंबई पालिका क्षेत्रात आज कोरोना बाधितांमध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळाले. शुक्रवारी मुंबईत दिवसभरात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४७० रुग्णांनी कोरोनामुक्त झाल्याची नोंद करण्यात आली होती. तर आज शनिवारी गेल्या २४ तासात ४६६ नव्या बाधितांचे निदान करण्यात आले तर ८०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या २४ तासात १२ जणांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात येत असला तर मुंबईत दिवसभरात ३३ हजार ४८० नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली असून सध्या ६ हजार ६१८ कोरोनाबाधितांवर मुंबई पालिका क्षेत्रात उपचार सुरु आहेत.

मुंबईतील सध्या ६ हजार ६१८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असून आतापर्यंत एकूण ७ लाख ३० हजार ७०७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७ लाख ६ हजार ४० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १५ हजार ६९० कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत मागील २४ तासात ८०६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून ३३ हजार ४८० कोरोना चाचण्या गेल्या २४ तासात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ७७ लाख ३३ हजारांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष व ५ रुग्ण महिला होते. १० रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर ९ जुलै ते १५ जुलै या एक आठवड्याच्या कालावधीत कोविड वाढीचा दर ०.०७ टक्क्यांवर आला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ९९३ दिवसांवर गेला आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -