घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! नव्या रुग्णसंख्येसह मृत्यूच्या संख्येत मोठी घट

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! नव्या रुग्णसंख्येसह मृत्यूच्या संख्येत मोठी घट

Subscribe

मुंबईत आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येसह मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ४८९ नवे कोरोनाबाधित आढळले असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ७ कोटी २५ लाख १६७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ५५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ७ हजार ९४७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

- Advertisement -

मुंबईत आज दिवसभरात ६४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६ कोटी ९९ हजार ३४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज दिवसभरात मुंबईत ३० हजार ७३७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत ७३ लाख २३ हजार १८३ नमुन्यांच्या चाचण्या पार पडल्या आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष आणि ३ रुग्ण महिला होत्या. ५ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ५ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

आता मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के झाले आहे. २८ जून ते ४ जुलै २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०८ टक्के असून मुंबईतील दुप्पटीचा दर ८०२ दिवस आहे. सध्या मुंबईत सक्रिय कंटेनमेंट झोन १३ आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारती ६५ आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट; ५१ जणांचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -