घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत रविवारी ५३६ रुग्णांची नोंद, तिघांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत रविवारी ५३६ रुग्णांची नोंद, तिघांचा मृत्यू

Subscribe

मुंबईतील मृत्यूसंख्या ही एक अंकी झाली असून आज केवळ तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूंची संख्या ही १६ हजार ६६१ इतकी आहे. मुंबईत ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंतचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट ०.९० टक्के इतका आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा पार पाचशेच्या घरात येऊन पोहचला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. आज रविवारी मुंबईत ५३६ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर केवळ तिघांचा आज कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत आज एकूण ३८ हजार ८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ५३६ चाचण्या पॉझिटीव्ह आल्यात. पॉझिटीव्ह नोंदवण्यात आलेल्या रुग्णांपैकी ९८ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत तर त्यातील २४ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. मुंबईतील खालावत चालेल्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील मृत्यूसंख्या ही एक अंकी झाली असून आज केवळ तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूंची संख्या ही १६ हजार ६६१ इतकी आहे. मुंबईत ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंतचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट ०.९० टक्के इतका आहे. तर मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९८ टक्के इतका आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईतील रिकव्हरी रेट खाली घसरला नव्हता त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. आताही रिकव्हरी रेट हा ९८ टक्के इतका आहे. मुंबईत आज १ हजार १५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या मुंबईत ५ हजार ७४३ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे केवळ १ सक्रीय सीलबंद इमारत आहेत.

- Advertisement -

तर राज्यात गेल्या २४ तासांत आज (रविवार) ९ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका आहे. तर मागील २४ तासांत २५ हजार १७५ इतके रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


हेही वाचा –  Maharashtra Corona Update: राज्यात ९ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -