Mumbai Corona Update : मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत घट, २४ तासात ५४५ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत आतापर्यंत ७ लाख २९ हजार ७९५ कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona Update: 545 corona cases recorded in 24 hours in Mumbai
Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात ५४५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारच्या तुलनेत घट झालेली पाहायला मिळाली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या घटली असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी मुंबईचा समावेश हा तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्यात आली नाही. मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे मुंबईकरांना निर्बंधात शिथिलता देण्यात यावी अशी मागणी मुंबईकर आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे.

मुंबईत आतापर्यंत ७ लाख २९ हजार ७९५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७ लाख ४ हजार ७६४ कोरोनाबधितांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत १५ हजार ६६७ कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात मुंबईत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी मृत्यू संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणात वाढ झाली असून मागील २४ तासात ५०५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची शोध घेण्यासाठी जलद आणि मोठ्या संख्येने कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. मुंबईत दिवसाला ३० हजारच्या वर कोरोना चाचण्या करण्यात येत असून मागील २४ तासात ३६ हजार ५६८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत केवळ मुंबई पालिका क्षेत्रात ७६ लाख ६५ हजार ३७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ८ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष व ६ रुग्ण महिला होते. १ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. ८ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित ४ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यावर गेला आहे.