मुंबईत आज, रविवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाली असली तरी दुसऱ्या बाजूला कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत देखील घट झाली आहे आणि मृत्यूची संख्या वाढली आहे. काल, शनिवारी मुंबईत ५७५ नवे कोरोबाधित रुग्ण आढळले होते, तर २१ जणांच्या मृत्यू नोंद झाली होती. तर आज मुंबईत २४ तासांत ५४८ नव्या कोरोनाबाधित आढळले असून २४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २४ हजार ५७८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६ लाख ९८ हजार ६९६ जण कोरोनामुक्त झाले असून १५ हजार ५४४ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १७ रुग्ण पुरुष आणि ७ रुग्ण महिल्या होत्या. १ रुग्णाचे वय ४० वर्षा खाली होते. १४ रुग्णांचे वय ६० वर्षावर होत. तर उर्वरित ९ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.
#CoronavirusUpdates
4th July, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/FMwdBk9wrf— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 4, 2021
मुंबईत हळूहळू कोरोना नियंत्रणात येताना दिसत आहे. मुंबईतील दाटीवाटीच्या धारावीतील झोपडपट्टीत आज एकही रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत सध्या २२ कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण आहेत. संपूर्ण मुंबईत देखील ८ हजार ११४ सक्रिय रुग्ण आहेत. आज दिवसभरात मुंबईत ३७ हजार १२८ कोरोना चाचण्या झाल्या. आतापर्यंत ७२ लाख ९२ हजार ४४६ जणांचा चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे आहे.
२७ जून ते ३ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०८ टक्के इतका आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ७६७ दिवस एवढा झाला आहे. सध्या सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या १४ आहे. तर सक्रिय सीलबंदी इमारती ६६ आहेत.
हेही वाचा – Mumbai Corona Update: मोठा दिलासा! धारावीत २४ तासांत एकही कोरोनाबाधिताची नोंद नाही