Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Update: मुंबईकरांची चिंता वाढली! दिवसभरात आढळले ६,१२३ रुग्ण

Corona Update: मुंबईकरांची चिंता वाढली! दिवसभरात आढळले ६,१२३ रुग्ण

Related Story

- Advertisement -

राज्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील महत्त्वाचे शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा समावेश आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. सलग तीन दिवसांपासून पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. पण आज हाच आकडा सहा हजार पार गेला आहे. आज मुंबईतील नव्या कोरोनाबाधित संख्येत यावर्षातील सर्वाधिक वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबईत ६ हजार १२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची आकडा ३ लाख ९१ हजार ७५१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ६४१ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ३७ हजार ५५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४१ हजार ६०९ जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आज दिवसभरात मुंबईत ४८ हजार ७५ जणांच्या कोरोनाचा चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ३९ लाख ३६ हजार ९३० जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट ८६ टक्के असून कोरोनाचा वाढीव दर १.६ टक्के इतका आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ६३ दिवस आहे. मुंबईत सध्या ५३ कंटेनमेंट झोन असून ५५१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत उद्यापासून नाईट कर्फ्यू, रात्री ८ नंतर फिरण्यास बंदी


 

 

- Advertisement -