Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा नाहीच, गेल्या २४ तासात ६३५ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २९ हजार २५० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Mumbai Corona Update: 545 corona cases recorded in 24 hours in Mumbai
Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असताना बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात कोरोना मुंबईत ६३५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. वाढती कोरोनाबाधितांच्या संख्येने मुंबईकरांची चिंता वाढवली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी ५०० हून कमी आढळली होती परंतु बुधवारी १०० कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्तच आहे. मुंबईत सध्या ७ लाख ४ हजार २५९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. तर गेल्या २४ तासात ५८२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्रा राजेश टोपे यांनी कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार मुंबईतही कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. मागील २४ तासात ३५ हजार ९६८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत मुंबई पालिका क्षेत्रात एकूण ७६ लाख २८ हजार ४६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २९ हजार २५० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ७ लाख ४ हजार २५९ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईती कोरोनाबाधितांची एकूण मृत्यू संख्या १५ हजार ६५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर ७ जुलै ते १३ जुलै २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०७ टक्के झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ९२८ दिवसांवर गेला आहे. मुंबईत मागील २४ तासात मृत्यू झालेल्यांपैकी ५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ४ रुग्ण पुरुष व ६ रुग्ण महिला होते. २ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. ४ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते तर उर्वरित ४ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.