घरCORONA UPDATEMumbai corona update: मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली, मात्र मृतांच्या संख्येत वाढ

Mumbai corona update: मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली, मात्र मृतांच्या संख्येत वाढ

Subscribe

मुंबईत आजही कोरोना आकडेवारी काही चढ- उतार पाहायला मिळत आहे. मुंबईतील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. तर शुक्रवारच्या तुलनेच आत मृतांचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे मुंबईतील आकडेवारीत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ६९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५७५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे.

पालिकेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या २४ तासांत ६९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत आत्तापर्यंतची एकुण रुग्णसंख्या ७ लाख २० हजार ३३९ वर पोहचली आहे. तर आज ५७५ रुग्ण कोरोनातून मुक्त होत घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ६ लाख ९२ हजार २४५ वर पोहचली आहे. यात आज २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोना मृतांचा १५ हजार ३६७ झाला आहे.

- Advertisement -

मुंबईतील रुग्णसंख्येचा दुप्पटीचा दर ७१३ दिवसांवर पोहचला आहे. तर १८ जून ते २४ जूनपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर ०.०९ टक्के झाला आहे. सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आता १० हजार ४३७ वर पोहचली आहे.मुंबईत मागील २४ तासात ३० हजार ८९८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ६९ लाख ७८ हजार १८८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत ९ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ९२ सक्रीय इमारती सीलबंद आहेत. मागील २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ९ रुग्ण पुरुष व ११ रुग्ण महिला होते. ५ रूग्णांचे वय ४० ते ६० वयोगटातील होते. १३ रुग्णाचे वय ६० वर्षाखाली होते, तर उर्वरित २ रुग्णांचे वय ४० खाली होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -