Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत सोमवारी ७२८ नवे रुग्ण, २८ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत सोमवारी ७२८ नवे रुग्ण, २८ जणांचा मृत्यू

मुंबईत आज ९८० रूग्णांनी कोरोनावर मात केली.

Related Story

- Advertisement -

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तरीही मुंबईतील रुग्णसंख्येत अनेक दिवस चढ उतार होताना दिसत आहे. मुंबईत कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या कमी झालेली दिसत आहे. मुंबईत आज,सोमवारी ७२८ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ८६६ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ७ लाख १२ हजार ३२९ इतकी झाली आहे. मुंबई महापालिकेने राबलेल्या योग्य सोयी सुविधांमुळे मुंबईत कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणणे शक्य झाले. मुंबईत गेल्या २४ तासात २८ हजार ७६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ७२८ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. (Mumbai Corona Update: 728 new corona patients, 28 died in Mumbai on Monday)


मुंबईतील बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही नेहमी अधिक असते. मात्र त्यातही गेल्या आठवडाभरापासून चढ उतार पहायला मिळत आहे. मुंबईत आज केवळ ९८० रूग्णांनी कोरोनावर मात केली. काल हीच संख्या १ हजार ४५ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ६ लाख ७९ हजार २५८ इतकी झाली आहे. तर मुंबईतील मृतांचा आकडाही कमी जास्त होत आहे. आज मुंबईत २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईची रुग्णसंख्या कमी होऊ लागली असली तरी मुंबईत अद्याप १५ हजार ७८६ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईच्या अँक्टिव्ह रुग्णांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने घट होत आहे. मुंबईचा ३१ मे ते ६ जून पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा आता ०.१२ टक्के इतका झाला आहे. तर मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९५ टक्के इतक आहे. मुंबईत सध्या केवळ २६ अँक्टिव्ह कंटेनमेंट झोन आहेत. तर ९६ अँक्टिव्ह सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – Maharashtra corona update: राज्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूसंख्येत मोठी घट, गेल्या २४ तासात १० हजार २१९ कोरोनाबाधितांची नोंद

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -