घरCORONA UPDATEMumbai corona update : मुंबईत गेल्या २४ तासात ७३३ कोरोनाबाधितांची नोंद, मृत्यूच्या...

Mumbai corona update : मुंबईत गेल्या २४ तासात ७३३ कोरोनाबाधितांची नोंद, मृत्यूच्या आकड्यात चढउतार

Subscribe

मुंबई पालिका क्षेत्रात १४ हजार ८०९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे

मुंबईतील कोरनाबाधितांच्या संख्येत दरदिवस चढउतार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मुंबईसह राज्यात धुमाकूळ घातला होता यानंतर राज्य सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनानं उपाययोजना करुन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवले आहे. परंतु मागील २४ तासात मुंबईत ७३३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील २४ तासात मुंबईत १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपुर्वी ६५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता डेल्टा प्लसच्या व्हेरिएंट्समुळे तिसरी लाट येणार आहे. तिसऱ्या लाटेचा परिणाम भयानक ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २१ हजार ३७० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून यामध्ये मागील २४ तासात ७३३ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ६ लाख ८८ हजार ९९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये ६५० कोरोना रुग्णांनी मात केली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात १४ हजार ८०९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आतापर्यंत १५ हजार २९८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यामध्ये मगाील २४ तासात १९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत मागील २४ तासात २८ हजार २२६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ६८ लाख १५ हजार २८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याचा दर ९५ टक्क्यावर गेला आहे. तर कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ७२६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत १५ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर सक्रीय ८० सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ११ रुग्ण पुरुष व ८ रुग्ण महिला होते. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. ९ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ७रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

- Advertisement -

मुंबईत १८ ते २९ वयोगटातील लसीकरण बंद

केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी योगा दिनाच्या निमित्त देशात लसीकरण सुरु करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परंतु राज्यातील लसीकरण केंद्रावर गर्दी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं १८ ते २९ वयोगटाचं लसीकरण करण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. तर ३० वरील वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईत सोमवार, मंगळवार, बुधवार नोंदणीशिवाय लसीकरण करण्यात येणार आहे तर गुरुवार, शुक्रवार, शनिवारी नोंदणी आणि नोंदणीशिवाय लसीकरण करण्यात येणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -