घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ७ हजारांहून आधिक नवे रुग्ण,७२...

Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ७ हजारांहून आधिक नवे रुग्ण,७२ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

मुंबईसह राज्यात काल पासून कडक लॉकडाऊन सुरु झाला. आज मुंबईतील रुग्णसंख्येत काही अंशी घट झाल्याचे दिसून आले. मुंबईत आज ७ हजार २२१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही ६ लाख १६ हजार २२१ इतकी झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत १२ हजार ६४८ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मुंबईत १६ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा १.३१ टक्के इतका आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुंबईतील कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. मुंबईत आज ४१ हजार ८२६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईची रुग्णसंख्या वाढत असली तरी गेली अनेक दिवस मुंबईचा रिकव्हरी रेट हा ८४ टक्के इतकाच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. आजही मुंबईत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ९ हजार ५४१ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ५ लाख २० हजार ६८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सध्या १२२ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर १ हजार २११ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

लसीच्या तुटवड्यामुळे ५२ लसीकरण केंद्र ठप्प

मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तुटवड्यामुळे ५२ खासगी लसीकरण केंद्र सध्या ठप्प करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. एकीकडे मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. लसीकरण केंद्रावर लसीचा मर्यादित साठा आल्याने खासगी लसीकरण केंद्र बंद केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Covid-19: वाहतूक कोंडीबाबत मुंबईकरांनी पोलिसांपुढे वाचला तक्रारींचा पाढा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -