घरCORONA UPDATEMumbai Corona Update:मुंबईत आज ८ हजार २१७ नव्या रुग्णांची नोंद, ४९ जणांचा...

Mumbai Corona Update:मुंबईत आज ८ हजार २१७ नव्या रुग्णांची नोंद, ४९ जणांचा मृत्यू

Subscribe

आज मुंबईत १० हजार ९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. काल मुंबईची रुग्णसंख्या १० हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली होती. मात्र आज रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत आज ८ हजार २१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यंत मुंबईत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ५३ हजार १५९ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुंबईत १० हजार ९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे आज ४९ जण कोरोनामुळे दगावले आहेत. गेल्या २४ तासात मुंबईमध्ये ४५ हजार ४८६ इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ८२ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे ८ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंतचा मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा हा १.६४ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे मुंबईत सध्या ९५ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर १ हजार १०० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत आतापर्यंत १२ हजार १८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत मुंबईत ४८ लाख १ हजार २१९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

वैध कारणांसाठीच करता येणार लोकलने प्रवास

मुंबईसह राज्यात १५ दिवसांचे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईत करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आजचा दुसरा दिवस होता. लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधात केवळ अत्याश्यक गरजांसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी वाहतूक सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र वैध कारण असल्यासच मुंबईकरांना लोकल आणि इतर वाहनानांनी प्रवास करता येणार आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा कहर कायम! पुन्हा ६० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -