घरCORONA UPDATEMumbai Corona Update : मुंबईत २४ तासात ८० कोरोना पॉझिटिव्ह, ११८ कोरोनामुक्त...

Mumbai Corona Update : मुंबईत २४ तासात ८० कोरोना पॉझिटिव्ह, ११८ कोरोनामुक्त तर एकही मृत्यू नाही

Subscribe

मागील २४ तासात मुंबईत ११८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९८ टक्के इतका आहे. मुंबईतील बाधितांची संख्या कमी होत असताना रिकव्हरी रेटही वाढल्याचे दिसून आले आहे.

Mumbai Corona Update :  मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. मुंबईत मागील २४ तासात  १६ हजार ६७१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील केवळ ८० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मुंबईत आज केवळ ८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या १०० इतकी होती. मागील काही दिवसांपासून मुंबईतील पॉझिटीव्हीटी रेट हा ०.०१ टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे मागील २४ तासात मुंबईत ११८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९८ टक्के इतका आहे. मुंबईतील बाधितांची संख्या कमी होत असताना रिकव्हरी रेटही वाढल्याचे दिसून आले आहे. दरदिवशी बाधितांपेक्षा रिकव्हर होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत १ लाख ३६ हजार ५०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

मुंबईत आजही एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईचा मृत्यदर हा शून्यावर येऊन ठेपला आहे. मागच्या १० दिवसात एकही कोरोनामृत्यू झालेला नाही. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत झालेल्या मृत्यूची संख्या पाहता ती १६ हजार ६९१ इतकी आहे.

मुंबईत कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत घट होतेय त्याचप्रमाणे रिकव्हरी रेटही वाढला आहे तर दुसरीकडे मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मुंबईत आजच्या दिवशी ६५० अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत सध्या सक्रिय कंटेनमेंट झोन आणि सक्रीय सील बंद इमारतींची संख्या ही शून्य इतकी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या आज पुन्हा घटली; 6,561 नवे रुग्ण, 142 मृत्यू

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -