Mumbai Corona Update: मुंबईत बाधितांची संख्या घटली! ७ जणांचा मृत्यू, पाहा आजची संपूर्ण आकडेवारी

मुंबईत आज एकूण ५१,४९२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ८०३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. मंबईत २५ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंतचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट हा ०.१४टक्के इतका आहे.

Mumbai Corona update 1965 new corona patient found in mumbai last 24 hrs

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याने मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आल्याने मुंबईकरांची नाईट लाइफ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मुंबईत २० हजारांच्या पार गेलेली कोरोना रुग्णांची संख्या आता हजारांच्या आत आली आहे. मुंबईत आज मंगळवारी ८०३ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवार पेक्षा आजच्या रुग्णसंख्येत शंभरने घट झाली आहे. मुंबईत आज एकूण ५१,४९२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ८०३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. मंबईत २५ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंतचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट हा ०.१४टक्के इतका आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण संख्या कमी होत असताना दुसरीकडे मृत्यूसंख्याही कमी झाली आहे. मुंबईचा मृत्यूदर हा आधीपासून कमी होता. आज मुंबईत ७ जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या ही १६,६३० इतकी झाली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असला तरी मुंबईत सध्या ८,८८८ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

मुंबईचा रिकव्हरी रेट सध्या ९७ टक्के इतका असून आज मुंबईत १,८०० रुग्णांनी आज कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत १ लाख,१९ हजार,८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांपैकी १५२ रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ३१ रुग्ण हे सध्या ऑक्सिजन बेडवर आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत सध्या ५ सक्रीय सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात १४ हजार ३७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद ; एकही ओमिक्रॉनबाधिताची नोंद नाही