घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: चिंताजनक! मुंबईत २४ तासांत ८,०६३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; धारावीत...

Mumbai Corona Update: चिंताजनक! मुंबईत २४ तासांत ८,०६३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; धारावीत आढळले ६० रुग्ण

Subscribe

मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९९ हजार ५२० झाली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३३७ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५० हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६८९ वाढली आहे म्हणजेच आज ८ हजार ६३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल, शनिवारी मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती. ही संख्या आज दीड हजारांहून वाढली आहे. तसेच आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसून ५७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आज ६० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७९वर पोहोचली आहे. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९९ हजार ५२० झाली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३३७ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५० हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २९ हजार ८१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज आढळलेल्या ८ हजार ६३ रुग्णांपैकी ७ हजार १७६ रुग्ण एसिम्पटोमॅटिक म्हणजेच लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात ४७ हजार ४१० कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ३७ लाख ६५ हजार ६५० चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील सध्याचा रिकव्हरी रेट ९४ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर १८३ दिवस आहे. तसेच सध्या २०३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Lockdown : ..तर येत्या काळात पुन्हा काही सेवांवर कडक निर्बंध लागतील, राजेश टोपेंचा इशारा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -