घरCORONA UPDATEcorona update: मुंबईत आज नव्या ८२३ रुग्णांची नोंद, ५ जणांचा मृत्यू

corona update: मुंबईत आज नव्या ८२३ रुग्णांची नोंद, ५ जणांचा मृत्यू

Subscribe

त्याचप्रमाणे आज मुंबईत एकूण ५ जणांची मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही ११ हजार ४३५ इतकी झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मुंबईची रुग्णसंख्या पाहाता मुंबईच्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज मुंबईत ८२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबईत ३ लाख १७ हजार ३१० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे आज मुंबईत एकूण ५ जणांची मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही ११ हजार ४३५ इतकी झाली आहे. राज्यासह मुंबईचाही रिकव्हरी रेट हा उत्तम आहे. आज मुंबईत एकूण ४४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुपणे घरी परतले आहेत. आतापर्यंत मुंबईत २ लाख ९८ हजार ४३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९४ टक्के इतका झाला आहे.

- Advertisement -

मुंबईतील वाढती कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या पाहिली तर १२ फेब्रुवारी २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनाचा ग्रोथ रेट हा ०.१८ टक्के इतका आहे. आजपर्यंत म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबईत ३० लाख ९८ हजार ८९४ कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. राज्यात आता कोरोनाचा नवा स्ट्रेन आढल्याचेही समोर आले आहे. मात्र हा ब्रिटन, ब्राझील यासारख्या देशाच्या स्ट्रेनसारखा घातक नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona In Maharashtra: चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार पार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -