Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट; १०४५ रुग्ण बरे

Mumbai Corona Update: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट; १०४५ रुग्ण बरे

गेल्या २४ तासांत बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या जास्त होती.

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका, तसेच स्थानिक प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना आता यश मिळताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आता घट असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मुंबईत ९७३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. शनिवारी हा आकडा कमी झालेला दिसला. मागील २४ तासांत ८६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १० हजार ८०७ इतकी झाली आहे. मृतांची संख्या मात्र काहीशी वाढली असून शनिवारी २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची संख्या ही १५ हजार ०१८ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के

तसेच समाधानकारक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या जास्त होती. शनिवारी ८६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना १०४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ७७ हजार ४४५ इतकी झाली आहे. त्यामुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९५ टक्के इतके कायम आहे.

- Advertisement -

रुग्ण दुप्पटीचा दर ५११ दिवस

मुंबईत आज २६ हजार ६६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ८६६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत सध्या १६ हजार १३३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच मुंबईत २९ मे ते ४ जून या कालावधीत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.१३ टक्के इतका होता. तर रुग्ण दुप्पटीचा दर ५११ दिवस इतका झाला आहे.

- Advertisement -