Mumbai Corona Update: मुंबईची रुग्णसंख्या १० हजारांच्या उंबरठ्यावर,आज ९हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबईत आज ३६ हजार ८७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या

Mumbai Corona Update: 10 corona patients die in 24 hours in Mumbai, 500 corona patients recovered
Mumbai Corona Update : मुंबईत २४ तासात १० कोरोना रुग्णांचा मृत्यू, ५०० रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांच्या उंबरठ्यावर आली आहे. दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. मुंबईत सोमवारी ९ हजार ८५७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही दहा हजरांचा टप्पा पार करणार असे चित्र आहे. मुंबईत आज ३ हजार ३५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे मुंबईत आज ३६ हजार ८७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईचा आतापर्यंत विचार केला असता मुंबईत आतापर्यंत ४ लाख ६२ हजार ३०२ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ लाख ७४ हजार ९८५ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ७९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ४३ लाख ६ हजार ५३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्के इतका आहे. २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंतचा विचार केला असता मुंबईतील कोरोना वाढीचा दर हा १.७० टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ७० सक्रिय कंटेनमेंट झोन आहे. तर ७४८ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात पसरणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी ४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईतही कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत रात्री नाईट कर्फ्यूचीही घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विकेंडला शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.


हेही वाचा – मुंबई पोलिसांकडून शहरात जमावबंदीचा आदेश जाहीर