Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ, रुग्णसंख्या पुन्हा १० हजारांच्या उंबरठ्यावर

Mumbai Corona Update: मुंबईच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ, रुग्णसंख्या पुन्हा १० हजारांच्या उंबरठ्यावर

मंगळवार पर्यंत कोरोनाचे रुग्ण कमी होते मात्र आज अचानक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा कहर अद्याप सुरु आहे. मुंबईत रुग्णसंख्येत घट होत असताना पुन्हा एकदा मुंबईची रुग्णसंख्या १० हजारांच्या पार जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत आज ९ हजार ९२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवार पर्यंत कोरोनाचे रुग्ण कमी होते मात्र आज अचानक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत आज ५६ हजार २६६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईची रुग्णसंख्या जरी १० हजारांच्या उंबरठ्यावर असली तरी आज मुंबईत ९ हजार २७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आज ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवार पर्यंत मुंबईत मृत्यूसंख्येत घट पहायला मिळत होती. काल मुंबईत २६ जणांचा मृत्यू झाला होता. आज मृत्यू संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता आणखीन वाढली आहे.

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत ५ लाख ४४ हजार ९४२ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ लाख ४४ हजार २१४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत मुंबईत १२ हजार १४० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या ४७ लाख ५५ हजार ७३३ इतकी आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याच दर हा ८१ टक्के इतका आहे. ७ एप्रिल ते १३ एप्रिलपर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर हा १.७१ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ९० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर ९९५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईत रात्री ८ वाजल्यापासून कडक लॉकडाऊन 

- Advertisement -

मुंबईसह राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून पुढचे १५ दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातही कोरोनाचे रुग्ण आहेत. ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत मुंबईसह राज्यातील लोकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज राज्यात ५८ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईसह राज्याची परिस्थितीही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.


हेही वाचा – Remdesivirचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारची मंजूरी

 

 

- Advertisement -