Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत ९६१ नवे रुग्ण, आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांपेक्षा...

Mumbai Corona Update: मुंबईत ९६१ नवे रुग्ण, आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या वाढली

आज मुंबईत २७ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला

Related Story

- Advertisement -

मुंबईतील रुग्णसंख्येत गेल्या अनेक दिवासांपासून चढ उतार होताना दिसत आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब ठरु शकते. मुंबईची रुग्णसंख्या गेल्या आठवडाभरापासून १ हजारांच्या आत नोंदवण्यात येत असली तरीही मुंबईत बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठा चढ उतार पहायाला मिळत आहे. आजही मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या अधिक आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची आणि बाधितांची संख्या जवळपास सारखी आहे. मुंबईत आज ९६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर केवळ ८९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल हिच संख्या १ हजारांच्या वर होती. मुंबईच्या रुग्णसंख्येत सतत होणारे चढउतार मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा ठरु नये यासाठी मुंबईकरांनी अद्याप काळजी घेणे गरजेचे आहे. (Mumbai Corona Update: 961 new patients in Mumbai, more infected than corona free patients today)


मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ७ लाख ८ हजार ९६८ इतकी झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजार ९६५ इतकी आहे. आज मुंबईत २७ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. कालच्या तुलनेत आज मृतांची संख्या कमी आहे. मुंबईतील मृत्यूदरही हळूहळू आटोक्यात येऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांमध्ये होणारी घट पाहता मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत आजही अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या मुंबईत अँक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार ६१२ इतकी झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत २७ मे ते २ जून पर्यंता विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.१३ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील अँक्टिव्ह कंटेनमेंट झोनची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. मुंबईत सध्या ३३ कंटेनमेंट झोन आणि १४५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुख्य हॉट्स स्पॉट ठरलेली धारावी आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. धारावीचे विशेष कौतुक म्हणजे धारावीत आज केवळ एका बाधित रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या धारावीत १९ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच; १५ हजार २२९ नव्या बाधितांची नोंद

- Advertisement -

 

 

- Advertisement -