Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत ९७३ नवे कोरोनाबाधित; १२०७ रुग्ण बरे

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत ९७३ नवे कोरोनाबाधित; १२०७ रुग्ण बरे

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९५ टक्के इतके झाले आहे.

Related Story

- Advertisement -

राज्याप्रमाणेच मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. मुंबईत मागील २४ तासांत ९७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ०९ हजार ९४१ इतकी झाली आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईतील रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी ९६१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती, तर शुक्रवारी हा आकडा काहीसा वाढून ९७३ इतका झाला. तसेच मुंबईत शुक्रवारी २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची संख्या ही १४ हजार ९८९ इतकी झाली आहे.

बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त

समाधानकारक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या जास्त होती. शुक्रवारी ९७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना १२०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ७६ हजार ४०० इतकी झाली आहे. त्यामुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९५ टक्के इतके झाले आहे.

- Advertisement -

१६ हजार ३४७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईत आज २७ हजार ३५१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ९७३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या मुंबईत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. मुंबईत सध्या १६ हजार ३४७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच २८ मे ते ३ या कालावधीत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.१३ टक्के इतका होता. तर रुग्ण दुप्पटीचा दर ५१५ दिवस इतका झाला आहे.

- Advertisement -