घरताज्या घडामोडीMumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा, २४ तासात २८८ कोरोनाबाधितांची नोंद, १...

Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा, २४ तासात २८८ कोरोनाबाधितांची नोंद, १ रुग्णाचा मृत्यू

Subscribe

कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सातत्याने जास्त असल्याचे दिसते आहे. मुंबईत १ रुग्णाच्या मृत्यूसह १६ हजार ६८३ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत केवळ २८८ कोरोनाबाधिंती नोंद झाली आहे. तर १ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी मुंबईत ३४९ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठला होता परंतु सध्याची परिस्थिती आटोक्यात आली असून मुंबई कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसते आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होणारी घट हे दिलासा देणारे आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर तिसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा ९८ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत गेल्या २४ तासात २८८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५३२ आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सातत्याने जास्त असल्याचे दिसते आहे. मुंबईत १ रुग्णाच्या मृत्यूसह १६ हजार ६८३ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत १,५४,०५० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी १,०३१,८३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २ हजार ६७७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. मुंबईतील ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२२ पर्यंतचा रुग्ण वाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर १३९७ दिवसांवर आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी जास्त होत असली तरी जोखीम असलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. कोरोना लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळत आहेत.

- Advertisement -

वाढत्या कोरोनारुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय कंटेनमेंट झोनच्या संख्येत वाढ झाली होती. तसेच अनेक इमारती सीलबंद करण्यात येत होत्या परंतु सध्याच्या स्थितीला कोणत्याही इमारतीला सीलबंद करण्यात आले नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीतसुद्धा घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासातील हा दर २.८ टक्के असा आहे. २८८ नवीन कोरोनाबाधितांपैकी केवळ ३५ रुग्णांना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा : पुण्यात किरीट सोमय्यांच्या सत्कार प्रकरणी ३०० जणांवर गुन्हा दाखल, पोलिसांची धडक कारवाई

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -