Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या घटली, २४ तासातील कोरोना मृतांचा आकडा शून्य

Mumbai corona Update Number of active corona victims in Mumbai 1 thousand 945
Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त आणि गर्दीचे शहर असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद मुंबईत होत होती. परंतु राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या उपाययजोनांमुळे मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय घट होत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 235 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच नव्या कोरोनाबाधितांपैकी फक्त 38 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण झाले असल्यामुळे जोखीम असलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 235 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये चढ -उतार पाहायला मिळत असली तरी मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या घटली आहे. सौम्य लक्षण आणि एसिम्पप्टोमॅटिक रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णलायत सध्या 2 हजार 301 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर मंगळवारी 14 रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले असून सध्या 458 रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासली आहे.

मुंबईत नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने जास्त राहिली आहे. मंगळवारी 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 1 लाख 32 हजार 632 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज कोरोना रुग्णांची संख्या शून्य असली तर एकूण 16 हजार 685 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई पालिका क्षेत्रामध्ये आज एकूण 25 हजार 338 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 158, 60, 216 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्क्यांवर स्थिरावला असल्याचे दिसत आहे. सक्रिय कंटेनमेंट झोन आणि सक्रिय सीलबंद इमारतींची संख्याही गेल्या काही दिवसांपासून शून्यावर आहे.


हेही वाचा : आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है- अमृता फडणवीसांचे राऊतांवर टि्वट