घरमुंबईदिलासाजनक! मुंबईतील रुग्णसंख्येत घट, २४ तासांत १ हजार ७९४ रुग्णांची नोंद

दिलासाजनक! मुंबईतील रुग्णसंख्येत घट, २४ तासांत १ हजार ७९४ रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यासह मुंबईत कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मात्र इतर जिल्ह्यांचा तुलनेत मुंबईत कोरोना प्रसाराचा वेग कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. यात गेल्या २४ तासांत मुंबईत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णापेक्षा कमी जवळपास दुप्पट असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुण्गांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजार ५८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६ लाख ७८ हजार २६९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ८९१ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १६ हजार ९९८ जण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईतील रिकव्हर रेट वाढला असून तो ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ४५ हजार ५३४ सक्रिय रुग्ण असून त्यांचावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान आज मृत्यू झालेल्या ६२ रुग्णांपैकी ५१ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच यामध्ये ४६ रुग्ण पुरुष आणि २८ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. तर ४४ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित २७ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

- Advertisement -

मुंबईत आज दिवसभरात २३ हजार ०६१ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असल्याने आत्तापर्यंत चाचण्यांची संख्या ५७ लाख ३३ हजार ४३१ वर पोहचली आहे. ३ मे ते ९ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर ०.४१ टक्के इतका असून दुप्पटीचा दर १६३ दिवसांवर आहे. मुंबईतील सक्रिय कंटेनमेंट झाने ८७ आहेत, तर सक्रिय सीलबंदी इमारती ४९३ इतक्या आहेत.

चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५६ लाख ७७ हजार ७८० जणांचा लसीकरण पार पडले आहे. दरम्यान आज मृत्यू झालेल्या ६२ रुग्णांपैकी ३२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त८सेच यामध्ये ३७ रुग्ण पुरुष आणि २५ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. तर ३८ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित २१ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.


देशात वेगाने होणार ‘Covaxin’ चा पुरवठा; Bharat Biotech पाठवणार दिल्लीसह १४ राज्यांना लस


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -