Mumbai Corona Update : मुंबईत आज 128 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 200 रुग्ण कोरोनामुक्त

Mumbai Corona Update covid19 mumbai reports 128 new corona cases 200 recoveries in the last 24 hours
Mumbai Corona Update : मुंबईत आज 128 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 200 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. मात्र काल आणि आज कोरोनाबाधितांची संख्या कायम राहिली असल्याचे दिसत आहे. मुंबई गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या 200 च्या आत राहिली आहे. यात गेल्या 24 तासामध्ये मुंबईत 128 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोना मृतांची संख्या आत शून्यावर आहे. याशिवाय 200 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ही 1 हजार 014 इतकी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आज आज नोंद झालेल्या 128 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 15 रुग्णांवर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे, त्यामुळे पालिकेच्या 36 हजार 102 बेड्सपैकी केवळ 721 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील आठड्याचा कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.02 टक्के इतका झाला आहे. तर रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. मुंबईतील कोरोना डबलिंग रेट 4238 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या आणि सील बंद इमारतींची संख्या शून्यावर आहे.

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात सहाव्यांदा शून्य मृत्युची नोंद

25 फेब्रुवारी रोजी मुंबईत पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली असून या महिन्यात सहाव्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. यापूर्वी मुंबईत 15,16,17 , 20 आणि 23 फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झालेली होती.

तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 2 जानेवारीनंतर दि. 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड’चा पहिला रुग्ण हा ‘मार्च २०२०’ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती. या नंतर ‘डिसेंबर २०२१’ मध्ये देखील ७ वेळा ‘शून्य’ मृत्यूंची नोंद झाली होती.


Space Station भारतावर पाडायचे की चीनवर?; रशियन स्पेस एजन्सीची थेट अमेरिकेला धमकी