Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट; आज 44 नवे रुग्ण, 1 मृत्यू

Mumbai Corona Update covid19 mumbai reports 44 new cases 53 recoveries and 1 deaht in last 24 hours
Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटलीच; आज 44 नवे रुग्ण, 1 मृत्यू

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. कालच्या तुलनेत आज पुन्हा मोठी घट झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 44 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल हीच रुग्णसंख्या 50 होती. मुंबईसाठी दिलासाजनक बाब म्हणजे मुंबईत 100 च्या घरात रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे मृतांची संख्याही मोठ्याप्रमाणात घटली आहे. मुंबईत आज 53 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत.
त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज १०३७४९३ इतकी झाली आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे.

कोरोना रुग्ण दुपटीचा दर 15 हजार पार

मुंबईत कमी आढळणाऱ्या रूग्णांमुळे कोरोना दुपटीचा दर 15 हजार 355 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील सक्रिय रूग्णसंख्या कमी झाली असून ही आज 314 इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या 44 रूग्णांपैकी 7 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर 1 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहे. पालिकेकडील 28 हजार 387 बेड्सपैकी केवळ 90 बेड वापरात आहेत.

9 मार्च 2021 ते 13 मार्च 2022 पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 00.05 टक्के इतका आहे. मुंबईसह इतर राज्यात रूग्ण कमी आढळत असल्याने देशातही कोरोना विषाणूचा संसर्ग मंदावला आहे. मुंबईत आज 15,425 कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यामुळे आत्तापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्याची संख्या 164,25,832 झाली आहे. तर मुंबईतील सक्रिय कंटेनमेंट झोन आणि सीलबंद इमारतींची संख्याही शून्य झाली आहे. त्यामुळे राज्याप्रमाणे मुंबई शहरातही कोरोना रुग्णसंख्या पूर्णपणे आटोक्यात येत आहे.


PM Modi : यावर्षी मोदी घेतील राजकीय संन्यास….स्वामी गिरी यांची भविष्यवाणी