Mumbai Corona Update : मुंबईत २४ तासात २३४७ रुग्ण झाले कोरोनामुक्त!

Coronavirus reinfection
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्याचा रिकव्हरी रेट एकीकडे ७९.६४ झालेला असताना मुंबईचा रिकव्हरी रेट मात्र ८२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. आज दिवसभरात मुंबईत २३४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा १ लाख ७६ हजार १७ इतका झाला आहे. मात्र, त्यासोबतच आज दिवसभरात ४८ मृत्यू झाले असून एकूण मृतांचा आकडा ९ हजार १०५ वर गेला आहे. २ हजार १०९ नवे कोरोनाबाधित आज दिवसभरात सापडले आहेत. मुंबईत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १४ हजार ४४५ इतकी झाली आहे. त्यामुळे एकीकडे रिकव्हरी रेट जरी वाढत असला, तरी मृतांचा आकडा आणि बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात अद्याप प्रशासनाला यश येत नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे.

mumbai corona update