घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत मृतांच्या संख्येत वाढ, आतापर्यंतची रुग्णसंख्या ६ लाख ९...

Mumbai Corona Update: मुंबईत मृतांच्या संख्येत वाढ, आतापर्यंतची रुग्णसंख्या ६ लाख ९ हजारांच्या घरात

Subscribe

मुंबईचा रिकव्हरी रेट हा ८४ टक्के

मुंबईसह राज्याची परिस्थिती भयंकर होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज रात्री ८ वाजल्यापासून पुढील १० दिवसांसाठी कडक लॉकडाऊन सुरु झाला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असतानाच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. आज मुंबईत ७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज ७ हजार ४१० नवे कोरोना रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेली रुग्णसंख्या ही ६ लाख ९ हजारांच्या घरात पोहचली आहे. मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत आणखी वाढ होत आहे.


मुंबईत रुग्णसंख्या त्याचप्रमाणे मृत्यूसंख्या वाढत असली तरी मुंबईचा रिकव्हरी रेट हा ८४ टक्के इतका आहे. मुंबईत आज ८ हजार ९० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५ लाख ११ हजार १४३ इतकी झाली आहे. १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा १.३५ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ११४ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर १ हजार १९८ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

आज रात्री ८ वाजल्यापासून मुंबईसह राज्यात कडक लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. १ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. राज्याची परिस्थितीही अतिशय गंभीर आहे. राज्यात मागच्या २४ तासात ६८ हजार १३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईप्रमाणे राज्यातील मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातही आज मृतांची संख्या ५०० च्या घरात पोहचली आहे.


हेही वाचा –  Maharashtra Corona Update: कोरोनाचा कहर कायम! राज्यात २४ तासांत ६७ हजार रुग्णवाढ, ५६८ जणांचा मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -