घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत वाढ तर २४ तासांत ६९२...

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत वाढ तर २४ तासांत ६९२ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

एकट्या मुंबईत एकून १५ हजार ४५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या निर्बंध कायम आहेत. परंतु मुंबईती कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबईकरांची चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ही १८ ते २० मध्ये होती. परंतू मागील २४ तासात कोरोनामुळे २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ६९२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ६८० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत सध्या एकूण ८ हजार ३५१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ७ लाख २२ हजार २१८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये आतापर्यंत ७ लाख ९६ हजार १०५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. एकट्या मुंबईत एकून १५ हजार ४५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना प्रादुर्भाव हद्दपार करण्यासाठी मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे.

- Advertisement -

कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्या वाढवल्या जात आहेत. आतापर्यंत ७१ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून मागील २४ तासात ३८ हजार ७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तर यामधील १७ रुग्ण पुरुष व ८ रुग्ण महिला होते. २ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. १३ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित १० रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ७१६ दिवसांवर येऊन पोहचला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -