घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत २४ तासांमध्ये कोरोना मृत्यूचा आकडा वाढला, तर...

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांमध्ये कोरोना मृत्यूचा आकडा वाढला, तर ७ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत सध्या ११४ सक्रिय कंनेटनमेंट झोन

मुंबईची कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. मुंबईतील मृतांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पहायला मिळत आहे. मुंबईत आज ६२ जणांचा तर कोरोनामुळे मृत्यू झाला. काल मुंबईत ३५ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला होता. मात्र आज मृतांची संख्येत वाढ झालेली पहायला मिळाली. त्याचप्रमाणे मुंबईच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईत आजही रुग्णसंख्या वाढली. आज ७ हजार ६८४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज एकूण ४७ हजार २७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या ११४ सक्रिय कंनेटनमेंट झोन आहेत.

- Advertisement -

मुंबईत आज ६ हजार ७९० जण कोरोनामुक्त झाले. मुंबईचा रिकव्हरी रेट ८४ टक्के इतका आहे. आतापर्यंत मुंबई ५ लाख ३ हजार ५३  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे १४ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंतचा मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर हा १.४२ टक्के इतका आहे. मुंबईत आतापर्यंत ६ लाख १ हजार ५९० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५० लाख ७५ हजार १५२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील उच्चभ्रू भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक 

मुंबईतील अनेक ठिकाणं ही कोरोनाचा हॉट्स पॉट ठरत आहेत. झोपडपट्टीतच नाही तर आता मुंबईतीली २४ विविध उच्चभ्रू अशा ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. मुंबईतील डी वॉर्डमधील मलबार हिल, परेड रोड आणि नेपानिया भागात कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. या भागात रुग्णवाढीचा दर हा १.८९ टक्के इतका आहे. मलबार हिल भागात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील वांद्रे, खार, सांताक्रूझ भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागात रुग्णवाढीचा दर हा १.८४ टक्के इतका आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: देशात कोणकोणत्या राज्यात मोफत लस? जाणून घ्या एका क्लिकवर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -