Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai corona Update Number of active corona victims in Mumbai 1 thousand 945
Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

कोरोना काळातील २ वर्षानंतर मुंबईकरांसाठी सुखद आणि दिलासादायक बातमी आहे. मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये वेगाने घट होत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत फक्त ४४ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून यामध्ये केवळ ४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आता ३४५ वर आली आहे. आतापर्यंत मुंबईत १ लाख ५७ हजार २६३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. मुंबई सध्याच्या स्थितीला एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नाही. निर्बंधातही सूट देण्यात आली आहे.

मुंबईत पुन्हा एकदा रविवारी शून्य रुग्णंच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबईत १६ हजार ६९२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ३७ हजार ३४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९८ टक्क्यांवर स्थिरावला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. रुग्ण दर दुप्पटीचा दर १३ हजार ७८८ दिवसांवर गेला आहे.

राज्याती सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत होत होती. पंरतु नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईतील सीनेमागृह आणि दुकाने पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.


हेही वाचा : पुस्तक मेळाव्यात अभिनेत्रीला पर्स चोरताना पकडले, मोठ्या प्रमाणात रोकड जप्त