Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत रुग्णवाढीचा दर ०.११ टक्क्यांवर, ६५८ रुग्णांची कोरोनावर मात

Mumbai Corona Update: मुंबईत रुग्णवाढीचा दर ०.११ टक्क्यांवर, ६५८ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईत आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही ६ लाख ८१ हजार ९४६

Related Story

- Advertisement -

मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असतानाच आता कोरोना रुग्णवाढीचा दरही ०.११ टक्क्यांवर आला आहे. (Mumbai growth rate is 0.11 per cent)  मुंबईत ४ जून ते १० जून पर्यंतचा विचार केला असता मुंबईत रुग्णवाढीचा दर हा ०.११ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तीन अंकी रुग्णसंख्या नोंदवण्यात येत आहे.आज शुक्रवारी मुंबईत ६९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईत बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल हीच संख्या ६६० इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ७ लाख १५ हजार १४६ इतकी झाली आहे. (Mumbai Corona Update: growth rate is 0.11 per cent, 658 patients corona free in mumbai today)


मुंबईत आज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही कमी नोंदवण्यात आली आहे. मुंबईत आज शुक्रवारी ६५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. (658 patients corona free in mumbai today) त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या अधिक आहे. आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये ११० ने घट झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही ६ लाख ८१ हजार ९४६ इतकी आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत चढ उतार पहायला मिळत आहे. आज मुंबईत २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हीच संख्या २२ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूची संख्या १५ हजार १४६ इतकी आहे. तर मुंबईत सध्या १५ हजार ८१९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी आज काही अंशी वाढ झाली आहे. तसेच मुंबईत अँक्टिव्ह कंटेनमेंट झोनची संख्या कमी होऊन २४ इतकी झाली आहे. तर मुंबईत सध्या ९२ अँक्टिव्ह सीलबंद इमारती आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Corona Update : कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या लपवण्यात येत नाही; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

 

- Advertisement -