घरCORONA UPDATEMumbai Corona Update : मुंबईत २४ तासांत ६६१ कोरोनाबाधितांची नोंद मात्र कोरोनामुळे...

Mumbai Corona Update : मुंबईत २४ तासांत ६६१ कोरोनाबाधितांची नोंद मात्र कोरोनामुळे मृत्यू संख्येत वाढ

Subscribe

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २२ हजार ८७९ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ उतार सुरुच आहे. कोरोनाच्या पार्श्वभीवर राज्यात तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईकरांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. मागील २ ते ३ दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत एकूण १५ हजार ४७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मागील २४ तासात २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत मागील २४ तासात ६६१ कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई पालिका क्षेत्रातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या घटली आहे मागील २४ तासात अवघ्या ४८९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २२ हजार ८७९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ६ लाख ९६ हजार ५९४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर संध्या ८ हजार ४९८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण ७१ लाख ८१ हजार ४५२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून मागील २४ तासात ३८ हजार ६५२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत मृत्यू झालेल्या २१ रुग्णापैकी १२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १२ रुग्ण पुरुष व ९ रुग्ण महिला होते. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. तर १२ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ६ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -