घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत ६ लाखांहून...

Mumbai Corona Update: मुंबईत ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत ६ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

Subscribe

आज ३ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. बाधित रुग्णांपेक्षा रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. काल मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. मात्र आज मुंबईत ८०० रुग्णांची घट झाली आहे. आज ३ हजार ५६ नव्या रुग्णांची मुंबईत नोंद करण्यात आली.  काल हा आकडा ३ हजार ८७९ इतका होता. असे असले तरी आज मुंबईत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज ३ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख हजार ३८३ इतकी झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९० टक्के आहे.


२९ एप्रिल ते ५ मे पर्यंतचा मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.५१ टक्के इतके आहे. तर मुंबईत आज ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज ३० हजार ९४२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ३ हजार ५६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत कंटेनमेंट झोनमध्येही आज घट झाली. मुंबईत सध्या ९६ सक्रिय कंटेनमेंट झोन आहे. तर ६४५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईतील कडक निर्बंधांमुळे मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आणणे शक्य झाले. त्यामुळे मुंबई महापालिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मुंबईत सध्या उपलब्ध असलेल्या लसकरण साठ्यातून १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस देण्यात येत आहे. लसीचा तुटवडा असल्याने अनेकांना तासतांस रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे मुंबई महापालिका इमारतींमध्ये जाऊन लसीकरण करणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पडेणेकर यांनी सांगितले आहे. ज्या सोसायट्यांमध्ये पुरेशी जागा आहे तिथे लसीकरण केले जाऊ शकते असे महापौर म्हणाल्या.


हेही वाचा – Corona नियंत्रणासाठी ऑक्सिजन व्यवस्थापनाचे ‘मुंबई मॉडेल’ कसे आहे?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -