Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत ५ हजारांहून अधिक अँक्टिव्ह रुग्ण, २४ तासात १०...

Mumbai Corona Update: मुंबईत ५ हजारांहून अधिक अँक्टिव्ह रुग्ण, २४ तासात १० जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासात मुंबईत १० बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय

Related Story

- Advertisement -

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात मुंबई महापालिकेचा यश आले आहे. मुंबईतील बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी अँक्टिव्ह रुग्णांची अधिक आहे. मुंबईत सध्या ५ हजार ६१० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र तरीही मुंबईकरांनी आणखी सावधानता बाळगळे महत्त्वाचे आहे. मुंबईतील बाधितांचा विचार केला असता मुंबईत गेल्या २४ तासात ३६२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या आता ७ लाख ३४ हजार ११९ इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर देखील ५ टक्क्यांवर आलाय. १८ जुलै ते २४ जुलैपर्यंतचा विचार केला असता मुंबईतील रुग्णवाढीचा दर हा ०.५ टक्क्ये इतका आहे. (Mumbai Corona Update: More than 5,000 active patients in Mumbai, 10 deaths in 24 hours)

- Advertisement -

मुंबईतील मृत्यूचे प्रमाण आता खूप कमी झालेय. काही दिवसांपासून मुंबईत एक अंकी मृत्यू आकडा नोंदवण्यात येतोय गेल्या २४ तासात मुंबईत १० बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. कालच्या तुलनेत मृत्यू आकड्यात २ ने वाढ झालीय. मुंबईतील आतापर्यंतची मृत्यूची आकडेवारी पाहिली तर मुंबईत आतापर्यंत १५ हजार ७७६ रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईतील मृत्यूसंख्या कमी झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय.

- Advertisement -

मुंबईत रुग्ण बरे होण्याची संख्या आजही बाधितांपेक्षा अधिक आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ५३९ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईत आज एकूण ३१ हजार ६०१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ३६२ चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात. मुंबईतील सक्रीय कंटेनमेंट झोनची संख्या देखील कमी झाली असून मुंबईत सध्या केवळ ३ सक्रीय कंटेनमेंट झोन आहेत. तर ६१ अँक्टिव्ह सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – India Corona Update: एका दिवसात बाधितांचा आकडा वाढला; ३९,७४२ नवे रूग्ण, ५३५ जणांचा मृत्यू

- Advertisement -