घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत २४ तासात अवघे १४४७ कोरोनाबाधित, बरे होणाऱ्यांचा आकडा...

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासात अवघे १४४७ कोरोनाबाधित, बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक

Subscribe

मुंबईत मृत झालेल्या रुग्णांपैकी ४१ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते.

मुंबईत कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा फायदा होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ४४७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २४ तासात ६२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली होती परंतु रुग्ण दरवाढ कमी झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात १,४४७ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यात एकुण ६ लाख ८७ हजार १५२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू गेल्या २४ तासात झाला आहे. आतापर्यंत १४ हजार २०० कोरोनाबाधितांचा मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई क्षेत्रात एकूण ५ करोड ८७ लाख ६ हजार १७५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आज १४८९९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत मृत झालेल्या रुग्णांपैकी ४१ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ४२ रुग्ण पुरुष व २० रुग्ण महिला आहेत. ५ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील आहे. ४४ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होत तर उर्वरित १३ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईती रुग्ण बरे होण्याचा दर ९२ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर २१३ दिवस झाला आहे. मुंबईत सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या ८७ वर गेली आहे. तर सक्रिय सीलबंद इमारती ३७७ आहेत.

- Advertisement -

२४ तासात बाधित रुग्ण – १४४७

२४ तासात बरे झालेले रुग्ण – २३३३
बरे झालेले एकूण रुग्ण – ६३४३१५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९२%

एकूण सक्रिय रुग्ण- ३६६७४

दुप्पटीचा दर- २१३ दिवस
कोविड वाढीचा दर (८ मे -१४ मे)- ०.३२%

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -