Mumbai Corona Update:मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर,तर अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

मुंबईत आज ८३१ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली

Mumbai corona Update Number of active corona victims in Mumbai 1 thousand 945
Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई रिकव्हरीच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे असे म्हटले जात आहे. मात्र आता अँक्टिव्ह रुग्णांमध्येही घट होताना दिसत आहे. कालच्या तुलनेत मुंबईत आज,मंगळवारी ४ हजारांनी घट झाली आहे. मुंबईत सध्या १७ हजार ३२८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे मुंबईच्या रिकव्हरी रेटमध्येही वाढ झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९४ वरुन ९५ टक्क्यावर आला आहे. (Mumbai Corona Update: Mumbai recovery rate at 95 per cent, number of active corona patients decreased)


मुंबईत आजही तीन अंकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. काल पेक्षा आज रुग्णसंख्या काही अंशी वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात २३ हजार ५०३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील ८३१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आज ८३१ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आजही कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत आज ५ हजार ८६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ७२ हजार ६६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील मृतांची आकडा पाहिला असता मुंबईत कालच्या तुलनेत आज मृतांचा आकडा कमी नोंदवण्यात आला आहे. मुंबईत आज २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हीच संख्या २९ इतकी होती. मुंबईत २५ मे ते ३१ मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण ०.१५ टक्क्यांवर आले आहे. त्याचप्रमाणे मुंबईत सध्या ३५ सक्रीय कंटेनमेंट झोन आणि १५३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ; १४ हजार १२३ नवे रुग्ण