Mumbai Corona Update : मुंबईत आज 1500 हून कमी कोरोनाबाधित रुग्ण; रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तिप्पट आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत आज मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत कोरोनाचे 1384 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यावेळी 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांपासून 2000 पेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत. तर 5686 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 42,570 चाचण्या करण्यात आल्या यापैकी 1384 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. आज नोंदवलेल्या रुग्णांपैकी 1,162 म्हणजे 84 टक्के रुग्ण लक्षणे नसलेली आहेत. तर गुरुवारी 184 बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 42 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत.

गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले बरेचशे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी 5,686 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तिप्पट आहे. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या आत्तापर्यंत 1,041,747 वर पोहोचली आहे, तर 16,581 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर पोहोचला आहे.


मुंबईतील कोरोना रिकव्हरी रेटसोबतचतं पॉझिटिव्हीटी रेट सातत्याने सुधारताना दिसतोय. बुधवारी शहराचा पॉझिटिव्ही रेट दर 4.3 टक्के नोंदवला गेला आहे. 19 दिवसांपूर्वी हा रेट 28.9 टक्क्यांवर नोंदवला गेला होता. यामुळे पॉझिटिव्हीटी रेटमध्ये सातत्याने घसरण होत आहे.

याबाबत मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, दैनंदिन रुग्णांमध्ये आणखी घट होण्याची अपेक्षा आहे. येत्या 10 दिवसांत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 1000 पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. सर्वजण याबाबत सतर्क असून संसर्ग पुन्हा पसरल्यास त्यास सामोरे जाण्यास देखील तयार आहोत.


राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर