घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर रुग्ण...

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर

Subscribe

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोरोना मृतांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आज किंचित घट झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारच्या तुलनेत आज रुग्णसंख्या ७२ ने कमी झाली आहे. यात कोरोनामुळे आज ९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३९१ कोरोनामुक्त नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ७ लाख ३५ हजार ३७१ इतकी आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ९ रुग्णांचा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने आत्तापर्यंत मृत्यांची संख्येत १५ हजार ९०७ इतकी झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९७ टक्क्यांवर पोहचला आहे. तर मुंबईत २६ जुलै ते १ ऑगस्ट २०२१ पर्यंत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.५ टक्के इतका झाला आहे. मुंबईत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १२ हजार ३११ वर पोहचली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णवाढीची संख्या कमी होत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. सध्या मुंबईतील कोरोना दुप्पटीचा दर हा १५०० दिवसांवर पोहचला आहे.

- Advertisement -

मुंबईत शनिवारी २६ हजार ७६८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील २५९ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात. तर आत्तापर्यंत मुंबईत ८२१२३०१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही सध्या ४ हजार ७४४ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोनाविषयी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. मुंबईत सध्या सक्रिय कंटेनमेंट झोनची (झोपडपट्ट्या आणि चाळी ) ३ वर आली आहे. तर सक्रिय सीलबंद इमारतींचा आकडा ४६ झाला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -