Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे 5708 नवे रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज एकूण 53 हजार 203 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण चाचण्यांची संख्या ही 148,31,298 इतकी झाली आहे.

मुंबईत आज रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे काही प्रमाणात आज मुंबईत घटले आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 5 हजार 708 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेय. तर 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 15 हजार 440 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या रुग्णांपैकी 550 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील 79 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेडवरील आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाण आज काही प्रमाणात घटले आहे.


मुंबईत आत्तापर्यंत 1,023,707 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 82 हजार 425 इतकी झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्क्यांवर पोहचलेय.
याशिवाय 16 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईती एक कोरोना वाढीचा दर हा 0.८१ टक्के झाला आहे.

मुंबईत आजही शून्य कंटेनमेंट झोन आहेत. तर 44 सक्रीय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत आज एकूण 53 हजार 203 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण चाचण्यांची संख्या ही 148,31,298 इतकी झाली आहे.


‘हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही की तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही; कोल्हेंची गोडसेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया