घरCORONA UPDATEमुंबईकरांनी कोरोना साखळी तोडून दाखवली, २४ तासात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक...

मुंबईकरांनी कोरोना साखळी तोडून दाखवली, २४ तासात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक रूग्ण

Subscribe

बाधितांची संख्या ही कोरोनामुक्त रुग्णांच्या दुप्पट असायची परंतु निर्बंधांमुळे आता ही संख्या आटोक्यात आणण्यात मनपा प्रशासनाला यश

मुंबईकरांना मागील काहीदिवसांपासून दिलासादायक बातमी मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत आहे. मार्चपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळाल्या होत्या परंतु राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षनिय घट होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ३ हजार ९०८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु ९० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यात मुंबई प्रशासन काहीअंशी यशस्वी ठरताना दिसत आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात एकुण ३९०८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर एकुण ५९०० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना साखळी तुटताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी बाधितांची संख्या ही कोरोनामुक्त रुग्णांच्या दुप्पट असायची परंतु निर्बंधांमुळे आता ही संख्या आटोक्यात आणण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. बाधितांची संख्या आटोक्यात आली असली तरी मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र १०० च्या घरात पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत एकुण ६ लाख ५२ हजार ५३२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ५ लाख ७८ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आता ५९ हजार ३१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे १३ हजार २५१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत एकुण ५४ लाख ६१ हजार ६०५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात ३७६०७ चाचण्या केल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबई जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर हा ८९ दिवसांवर पोहचला आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर हा खाली आला होता परंतु आता पुन्हा रुग्ण वाढीचा दर हा ८९ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची साखळी तोडण्यात यश येताना दिसत आहे. मागील २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५३ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ५७ रुग्ण पुरुष व ३३ रुग्ण महिला होते. ९ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. ५० रुग्णांचे वय ६० वर्षांवरील होते. तर उर्वरित ३१ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -