घरCORONA UPDATEMumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी ६० कोरोनाबाधित तर ७७ जण कोरोनामुक्त

Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी ६० कोरोनाबाधित तर ७७ जण कोरोनामुक्त

Subscribe

मुंबईतील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा अधिक असून मुंबईत आज ७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत १ लाख ३६ हजार ९७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या शंभरीच्या आत आली असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई आज, मंगळावारी ६० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत असला तरी मुंबईकरांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मुंबईत कोरोना तिसऱ्या लाटेत आढळलेल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा पाहिला असता तो १ लाख ५७ हजार १६ इतका आहे. तर मुंबईत आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईत आतापर्यंतचा मृतांचा आकडा १६ हजार ६९२ इतका आहे.

मुंबईतील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा अधिक असून मुंबईत आज ७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत १ लाख ३६ हजार ९७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांचा विचार केला असता मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील पाचशेच्या आत पोहचली आहे. सध्या मुंबईत ४६७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

आज मुंबईत एकूण १२ हजार १६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील ६० चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. ६० बाधितांपैकी ६ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेत तर त्यातील २ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ४६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर राज्यात आज ७१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ७७ लाख १८ हजार ५४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के एवढे झाले आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत वाढ! 24 तासांत 460 नव्या रुग्णांची वाढ, तर 5 जणांचा मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -